ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मर्सी नदी
इंग्लंडच्या वायव्य भागातील चेशर व लँकाशर परगण्यांतून वाहणारी प्रमुख नदी . लांबी ११० किमी.
मुंबई मधील पूर
नदीवर झालेली अतिक्रमणे, पूराच्या पाण्याचा निचरा, मैला ही पुराची काही कारणे होत.
अभ्यास संवर्धित शेतीमधील समस्यांचा...
काडातून थेट पेरणी करणाऱ्या यंत्राने पेरणी केली, की किफायतशीर उत्पादन आणि सुपीक जमीन, असे संवर्धित शेतीचे स्वरूप असले, तरी त्याच्यातही काही अडचणी आहेत.
पिरॅमिडमध्ये मृतदेह कुजत नाही!
सामान्यपणे मृतदेह जास्त काळ अंत्यसंस्कारावाचून राहिला की तो कुजायला लागतो आणि दरुगधी येऊ लागते. इजिप्तमधल्या पिरॅमिडमध्ये हजारो वर्षांपूर्वीचे मृतदेह आहेत.
द्रावा नदी
द्रावा नदी : दक्षिण मध्य यूरोपमधील डॅन्यूबला उजवीकडून मिळणारी एक नदी. ही दोबियाक्कोजवळ इटली व ऑस्ट्रिया यांच्या सरहद्दीवर कार्निक आल्प्स पर्वतात उगम पावते. उगमानंतर ऑस्ट्रिया, यूगोस्लाव्हियामधून व यूगोस्लाव्हिया-हंगेरी यांच्या सीमेवरून वाहत जाऊन ऑसियेकच्या पूर्वेस सु. १८किमी. वर डॅन्यूबला मिळते.
फ्रिझियन बेटे
फ्रिझियन बेटे : यूरोपच्या वायव्येस उत्तर समुद्रात पसरलेली द्वीपमालिका . ही नेदर्लंड्समधील नॉर्थ हॉलंड प्रांताच्या उत्तर टोकापासून डेन्मार्कच्या मांदर बेटापर्यंत पसरली आहे . नेदर्लंड्स , प . जर्मनी यांच्या उत्तर व डेन्मार्कच्या प . किनाऱ्याला ही रांग समांतर असून किनाऱ्यापासून तिचे अंतर सु . ५ ते ३२ किमी . आहे .
अँबोइना
अँबोइना : इंडोनेशिया प्रजासत्ताकातील बेट व शहर. हल्लीचे नाव ‘आंबोन’. अक्षांश ३०२९' ते ३०४८' द. व रेखांश १२७०५४' ते १२८० २५' पू. हे मालूक् प्रांतात व द्वीपसमूहात, बांदा समुद्राच्या उत्तरेस आणि सेराम बेटाच्या दक्षिणेस ५१·५ किमी. लांब व १६ किमी. रुंद पसरले आहे.
आरा
आरा : बिहार राज्यातील शहाबाद जिल्ह्याचे मुख्य ठाणे. लोकसंख्या ९२,६७० (१९७१). गंगेच्या दक्षिणेस सुमारे २२ किमी. अंतरावर, आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा उंचावरचे म्हणजे अरारमधील ठिकाण म्हणून याला आरा हे नाव पडले असावे. जवळच्या मसार गावी सापडलेल्या जैन हस्तलिखितातील 'आरामनगर' हा उल्लेख याच शहराबद्दल आहे.
स्वान्झी
स्वान्झी : ग्रेट ब्रिटनच्या वेल्स विभागातील दक्षिण ग्लॅमरगन परगण्यातील ऐतिहासिक, औद्योगिक शहर व बंदर. ते ब्रिस्टल खाडीवर ट्वे नदीमुखाशी वसले आहे. लोकसंख्या २,३९,००० (२०११). दक्षिण वेल्स हा ग्रेट ब्रिटनमधील प्रमुख कोळसा आणि धातू उत्पादक प्रदेश असून स्वान्झी हे या प्रदेशातील महत्त्वाचे केंद्र आहे.
बारांगकिया
बारांगकिया : द. अमेरिकेमधील कोलंबिया या देशातील आटलांटीको विभागाची राजधानी, प्रमुख सागरी बंदर व शहर. लोकसंख्या ८,२५,४८७ (१९७८ अंदाज). हे मॅग्डालीना नदीकाठावर मुखापासून आत सु. १६ किमी. वर वसले असून, अंतर्गत जलवाहतुकीचे अंतिम स्थान म्हणूनही यास महत्त्व आहे.
सुएझ
सुएझ : ईजिप्तमधील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर व बंदर. लोकसंख्या ४,८८,१२५ (२०११). हे कैरोच्या पूर्वेस १३० किमी. वर सुएझ कालव्याच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळ वसलेले आहे. बुर इब्राहिम आणि बुर तौफिक ही दोन बंदरे आणि पूर्वेकडील वाळवंट मिळून हा एक ॲस सुएझस ( महकजह ) नावाचा राखीव सरसुभा आहे.
English to Hindi Transliterate